महापारेषणच्या वतीने ऊर्जा कंपन्यांच्या  वाहनचालकांसाठी कार्यशाळा

 

मेट्रो सोलापूर √ महापारेषण कंपनीच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही कंपन्यांतील वाहनचालकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा मुंबईतील भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत नुकतीच घेण्यात आली. 

या कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे अतिरिक्त संचालक विश्वास पाठक यांच्या हस्ते झाले यावेळी महापारेषणचे संचालक मानव संसाधन सुगत गमरे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पाठक म्हणाले, कंपनीच्या प्रगतीमध्ये वाहनचालकांची महत्त्वाची भूमिका आहे. वाहनचालकांची जबाबदारी ही हवाई जहाज, रेल्वेचा लोको पायलट यांच्याएवढीच महत्त्वपूर्ण आहे. तिन्ही वाहनचालकांच्या काही समस्या असतील तर त्या जाणून घ्या व त्याचे निराकरण करण्याबाबतची कार्यवाही प्रशासन स्तरावर करण्यात यावी तसेच वाहनचालकांच्या वैद्यकीय तपासण्या करणे आवश्यक आहे.

 महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्या जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी संस्कृती व कार्यप्रणाली एकसारखीच असल्याने सर्व वाहनचालकांची एकमेकांमध्ये विचारांची देवाण – घेवाण व्हावी, परस्पर सहकार्य रहावे अशी अपेक्षा या कार्यशाळेत सुगत गमरे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. 

यावेळी महापारेषणचे मनुष्यबळ नियोजन महाव्यवस्थापक राजू गायकवाड, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील प्रशिक्षण विभागाचे अधीक्षक अभियंता संजीवकुमार बद्देला,वरिष्ठ व्यवस्थापक स्वप्नील साळुंखे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानव संसाधनाचे व्यवस्थापक महेश आंबेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *