नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-व्हेईकल टेक्नॉलॉजीचा नवीन कोर्स सुरू

 

मेट्रो सोलापूर √ जागतिक पातळीवर वाहनामुळे वाढत असलेल्या प्रदुषणाची खूप गंभीर समस्या निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर नुकतेच आखिल भारतीय तंत्रशास्त्र परिषद, नवी दिल्लीने चालू शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पासून नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम ई – व्हेईकल टेक्नॉलॉजी [E-Vehicle Technology] ला मान्यता मिळाली आहे.

सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी वाढत असून व यासाठी या उद्योगातील कुशल व्यावसायिकांची वेगाने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केलेला असून त्याचा अग्रगण्य कार्यक्रम तयार करण्यात आला आहे या अभ्यासक्रमात सहा विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली आहे.

कोर्स बद्दल माहिती

ई-वाहन तंत्रज्ञान [E-Vehicle Technology] अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील सर्वसमावेशक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्यांसह सुसज्ज करणे आहे. इलेक्ट्रिक पॉवरट्रेन डिझाइन, बॅटरी टेक्नॉलॉजी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, व्हेईकल डायनॅमिक्स आणि शाश्वत ऊर्जा उपाय यासारख्या आवश्यक बाबींचा अंतर्भाव करण्यासाठी हा अभ्यासक्रम बारकाईने तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हँड्स-ऑन प्रशिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योग सहकार्यांचा फायदा होईल, हे सुनिश्चित करून ते विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे या अभ्यासक्रमासाठी कौशल्य विकसित विशेष प्रशिक्षित शिक्षक नियुक्त असतील.

ई – वाहन तंत्रज्ञानाचे महत्त्व

कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि हवामानातील बदल कमी करण्यात इलेक्ट्रिक वाहने (EV महत्त्वाची भूमिका बजावत असून, शाश्वत वाहतुकीकडे जागतिक बदल वेगाने होत आहे. भविष्यासाठी वाहन तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण का आहे याची काही प्रमुख कारणे पर्यावरणीय प्रभाव, ऊर्जा कार्यक्षमता, आर्थिकवाढ, तांत्रिक नवोपक्रम, ऊर्जा स्वातंत्र्य हे आहेत.

दोन वर्षीय या ई-व्हेईकल कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र असतील याचबरोबर गेट ही ऑनलाईन परीक्षा देणे बंधनकारक असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के.सोनगे अभ्यासक्रम समन्वयक प्रा.कदीर शेख,
मेकॅनिकल विभागाचे प्रमुख एस. एस.काळे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *