चक्रीवादळात कोसळलेल्या 220 के.व्ही. विद्युत मनोऱ्यांची महापारेषणने केली विक्रमी वेळेत उभारणी !

मेट्रो सोलापूर √ दिनांक 26 मे 2024 रोजी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले या चक्रीवादळाचा तडाखा परळी व परिसरालाही बसला. त्या वादळामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या गिरवली विभागाअंतर्गत येणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीचे सहा मनोरे नंदागौळ आणि अंबलवाडीच्या अतिदुर्गम डोंगरांमध्ये कोसळले. या दुर्घटनेमुळे 220 के.व्ही. गिरवली परळी सर्किट – 2 आणि 220 केव्ही परळी PGCIL (पॉवरग्रिड) सर्किट – 2 या अशा दोन महत्त्वाच्या विद्युत वाहिन्या बंद पडल्यामुळे बीड व लातूर या जिल्ह्यांना होणाऱ्या विद्युत पुरवठ्याची परिस्थिती अत्यंत नाजूक बनली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापारेषण प्रशासनाकडून तातडीने उपाय योजनेसाठी पाऊले उचलण्यात आली. महापारेषण कंपनीचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण , छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता नासिर कादरी तसेच परळी मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पुनर्रउभारणीच्या कामाची नियोजनबद्ध आखणी केली. या कामासाठी लातूर, परळी व गिरवली येथील अभियंते व कर्मचाऱ्यांची संघबांधणी करून मनोरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. भौगोलिक दृष्ट्या अत्यंत दुर्गम असलेल्या डोंगरांवर मनोरे पुनर्रउभारणीचे काम करणे अतिशय जिकरीचे व अवघड होते. प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे मनोरा उभारणीसाठी लागणारे साहित्य व यंत्रसामग्रीची वाहतूक करणे अत्यंत कठीण होते. या सर्व अडचणींवर मात करीत एकसंघपणे महापारेषणचे अभियंते व कर्मचारी मुख्य अभियंता नासिर कादरी व अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र काम करण्यात आले.

अत्यंत कडक उन्हात कुठल्याही प्रकारची सावली नसलेल्या निर्जळ ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक तांत्रिक अडचणीवर मात करीत महापारेषाणच्या परळी, लातूर, बीड चे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे अहोरात्र मेहनत घेऊन कोसळलेल्या सहा विद्युत मनोऱ्यांचे पायाभरणी, मनोरा उभारणी आणि 2 किलोमीटर तार ओढणीचे काम विक्रमी वेळात पूर्ण केले व 220 के. व्ही. परळी PGCIL (पॉवरग्रिड) सर्किट-II ही विद्युत वाहनी दिनांक 04.06.2024 रोजी म्हणजेच अवघ्या नऊ दिवसात पूर्ववत केली. या कामाकरिता नांदेड प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत दिवाकर, लातूर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गडदे, 400 के. व्ही (संवसु.) गिरवली विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जोशी, अ.उ.दा (संवसु.) बीड विभागाचे कार्यकारी अभियंता वासुदेव लबासे, अ.उ.दा (संवसु.) लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जायभाय, मेजरस्टोअर धारशिव कार्यकारी अभियंता संजीव चाटे तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत दगडगुंडे, संतोष चव्हाण, प्रशांत चव्हाण, सचिन चव्हाण, महेश नडगिरे, दिलीप फेरे, उप-कार्यकारी अभियंता संदीपान नगरगोजे, नितीन मुंडे, ऋषिकेश नायगावकर, डी. बी. मारलापल्ले, सहाय्यक अभियंता राजेश तिडके तसेच परळी मंडळातील वेगवेगळ्या वाहिनी उपविभागातील लाईनस्टाफ सर्वश्री. अमजत संगतराज, कैलास आतमवाड, पंकज भागवत, शत्रुघ्न गाढवे, वैजनाथ फड, संजय पोखरकर, प्रशांत मसने, प्रवीण टाकळगावे, सिद्धेश्वर गिते, धनंजय झिरमिळे, एस.डी. माळी, व्ही.एच. राठोड, ए.बी. सगर, आर.डी. बचाटे, ए.वी. होळकर, जि.बी.माळी, यस. यस. सुकेवार, जि.बी. गवारे, यन.बी. कसपटे, के.ए. गुरव यांनी दिवस-रात्र मनोऱ्याची पायाभरणी व उभारणी करिता देखरेख केली.

काम लवकर पूर्ण होण्यासाठी अभियंते व कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी तळ ठोकून होते. अशा निर्जळ व दुर्गम भागात कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे काम लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून महापारेषणने कामावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाणी व जेवणाची व्यवस्था प्रत्यक्ष घटनास्थळावरच करण्यात आली होती

या कामी मे. सोमेश्वर विद्युत या एजन्सीचे संचालक चंद्रकांत गिते, पर्यवेक्षक रामेश्वर आपेट व त्यांच्या चमुने दिवसरात्र काम केले तसेच मनुष्यबळ वाढवण्याकरिता नांदेड व परतुर येथून मे. सुजाता एलेक्ट्रिकल्स व मे. निळशिखा यांच्या टीम मागवण्यात आल्या.
या मनोराच्या पुनर्रउभारणी कार्यामुळे सदर वाहिनीद्वारे होणारा विद्युत पुरवठ पूर्ववत झाला महापारेषण कंपनीच्या तांत्रिक टीमचे आणि अभियंत्यांचे कार्य कौतुकास्पद ठरले असून, त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *