नालेसफाईचे कामे त्वरित पूर्ण करा…

 

 

 

    सोमपा मा.गटनेते आनंद चंदनशिवेनी दिले निवेदन

मेट्रो सोलापूर √ सोलापूर शहर – बाळे हद्दवाढ परिसरातील नाले रुंदिकरण करणे व सपाटीकरण लवकरात लवकर करून अनुचित अपघात टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना सोमपा मा.गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सोलापुरातील जुना कारंबा नाका ते बार्शी टोल नाका परिसरातून वाहणारे नाले रुंदिकरण व सपाटीकरण न केल्याने वरुन वाहत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच आगामी काळात शाळा व कॉलेज यांची सुरुवात होणार आहे यंदा पाऊसमान चांगला असल्याने वाहणारे ओढे नाले यांची तातडीने नाला रुंदिकरण व सपाटीकरण करून नागरिकांची गैरसोय टाळावी. 

 

1) जुना पुना नाका स्मशानभुमीलगत. 

2) जुना कारंबा नाका स्मशानभुमीलगत. 

3) बार्शी टोल नाका व जुना कारंबा नाका टोल मार्गावरील नाकोडा कन्स्ट्रक्शन बाजुचा काळा नाला. 

4) बाळे रोडवरील करजगी बंगला शेजारील नाला.

5) बाळे परिसरातील बाळे पोलिस चौकी व भागवत शोरुम बाजूचा नाला. 

वरील प्रमाणे वाहणारे नाल्यांचे रुंदिकरण व सपाटीकरण करुन घेतल्यास नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊ नये याकरिता बाळे हद्दवाढ परिसरातील नाले रुंदिकरण करणे व सपाटीकरण करणेबाबत संबंधितास आदेश व्हावे अशा प्रकारे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमपा मा.गटनेते आनंद चंदनशिवे,मा.नगरसेवक गणेश पुजारी, समाधान सकट आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *