एन के किड्स स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

मेट्रो सोलापूर √ बाळे येथील एन के किड्स स्कूल मध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला.
शाळेचा पहिला दिवस या दिवशी रंगीत रांगोळ्या,रंगीबिरंगी फुग्यांची कमान,फुलांच्या पायघड्या,सुंदर फलक लेखन फुलामाळांची सजावट याने शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला मुलांना गुलाबाचे फुल व फुगे व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ आलुरे अध्यक्ष विकास कस्तुरे आनंद भवर अंजली गुरव मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे शिक्षिका दिपाली कुलकर्णी.अश्विनी सिंगन कोमल आदलिंगे .पुनम कळसाईत .सेविका संगीता हेगडेवार पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवगतांच्या स्वागता नंतर सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच सर्व मुलांचे मुख्याध्यापिका सौ. श्वेता कस्तुरे वअंजली गुरव यांनी औक्षण केले. तसेच संस्थेच्या मान्यवरांनी ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. व सर्व बालकांना खाऊ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *