सशस्त्र पोलीस शिपाई भरती उमेदवारांची उत्तेजित द्रव्यांची वैद्यकीय तपासणी होणार

सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया – 2022-23

मेट्रो सोलापूर √ समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्र -10, सोलापूर कार्यालयातील आस्थापनेसाठी एकुण 240 रिक्त पदांची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 ची प्रक्रिया दिनांक-19/06/2024 ते दिनांक 07/07/2024 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली आहे.

सदर प्रक्रियेमध्ये उमेदवारांची 100 मी धावणे, 05 किमी धावणे व गोळा फेक या मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीच्या वेळी काही उमेदवार शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी उत्तेजित द्रव्य, स्टिरॉईड, गोळ्या (Tablets) किंवा इंजेक्शन चा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी चाचणी दरम्यान उत्तेजित द्रव्यांचे गोळ्यांचे सेवन केल्यामुळे संबधीत उमेदवारांचे शरिरावर गंभिर परिणाम होण्याची शक्यता आहे व त्यामध्ये उमेदवारांचे जिवास धोका होवू शकतो असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत असून सदर प्रकारच्या बाबींना आळा घालण्यासाठी या कार्यालयाकडून उत्तेजित द्रव्य, स्टिरॉईड, गोळ्या (Tablets) किंवा इंजेक्शन इ.साठी तपासणी पथक नेमण्यात आले असून प्रत्येकी ठिकाणी सीसीटीव्ही, हॅण्ड कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच वैद्यकीय पथक नेमण्यात आले असून त्यांचेकडून संशयास्पद उमेदवार आढळल्यास संबधीताचे रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे तसेच सदर बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले आहे.

उमेदवारांची उत्तेजित द्रव्यांची वैद्यकीय तपासणी होणार

त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून जाहिर आवाहन करण्यात येते की, सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-2023 चे मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी त्यांची शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्तेजित द्रव्य, स्टिरॉईड, गोळ्या (Tablets) किंवा इंजेक्शनचा वापर करू नये. सदर बाबींचा वापर केल्याचे मैदानी चाचणी दरम्यान निदर्शनास आल्यास संबधीत उमेदवारांस भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात येवून त्यांचेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पोलीस भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांच्या पालकांनी नातेवाईकांनी संबधीत उमेदवारास मैदानी चाचणी दरम्यान शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकरच्या उत्तेजीत द्रव्यांचा वापर करू नये याबाबतचे समुपदेशन करावे.
पोलीस भरती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दल बल गट 10 सोलापूर कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *