बाळे येथील लक्ष्मी नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा सोमपा प्रशासनाला दिले निवेदन

 

  भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्या वतीने दिले निवेदन

 मेट्रो सोलापूर √ बाळे येथील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या दहा वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तातडीने नवी पाईपलाईन घालावी, अशी मागणी भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्यावतीने महापालिका आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

         प्रभाग क्र ५ मधील बाळे परिसरातील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रीक मोटार लावुन सुध्दा पाणी येत नाही. नागरीकांना विज बिल जास्त आल्याने आर्थिक भुर्दंड सोसुन देखील पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.

         लक्ष्मी नगर येथे जलवाहिनी ही बाळे पोलिस चौकीच्या बाजुच्या पुलाखालील वैष्णवी हाईटच्या बाजुने चंडक शाळेच्या चढावरुन येत असल्याने पाण्याचा दाब कमी येतो. तेव्हा बाळे येथील चौकातुन ब्रिजघालुन जलवाहिनी टाकल्यास पाणीपुरवठा चांगल्या दाबाने होऊ शकतो. कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढता येईल. तेव्हा नवी पाईपलाईन घालून कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी राजू आलुरे , आनंद भवर, विनय ढेपे, अमोल झाडगे, नंदू बटाणे , शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *