स्वयंशिक्षा फाउंडेशनतर्फे महिलांना छत्र्यांचे वाटप…

मेट्रो सोलापूर – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे बचत गटातील 2000 महिलांना छत्र्यांचे वाटप फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले

गुरुवारी येळेगाव येथे निसर्ग लोक संचलित साधन केंद्र मंद्रूपची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत मंद्रूप सह अठरा गावातील बचत गटांच्या जवळपास 2 हजार महिला उपस्थित होत्या या सर्व महिलांना वैद्य यांच्यासह संस्थेच्या अध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, व्यवस्थापिका रेखा कदम, सायराबानू शेख, ताई कांबळे यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय नकाते, सिद्धेश्वर काळे, राजू काळे, दयानंद कोळी ,प्रशांत कोळी ,गुरुराज लिंगफोडे आदी उपस्थित होते.

⏹️  महिलांना रोजगार मिळवून देणार  ⏹️

बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी होत आहेत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या हाताला चांगला रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील असे फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *