सोलापूर सिव्हिलमध्ये नवीन एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीची मागणी

 

 

नामदार मुश्रीफ यांनी आधिष्ठाता संजीव ठाकूराना प्रस्ताव पाठवण्याचे दिले तात्काळ आदेश

मेट्रो सोलापूर – महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ आज सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयामधील [ सिव्हिल ] एमआरआय मशीन ही कालबाह्य झालेली आहे. सोलापूर शहर हे गोरगरीब कामगार कष्टकरी मध्यमवर्गीयांचे शहर असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या उपचारासाठी कालबाह्य MRI मशीनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असल्याने शासकीय रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान असलेली MRI मशीनची अत्यंत गरज असून त्याकरिता नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर सोलापूर शहरातील अनेक उद्योगपती सीएसआर फंडातून शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता इच्छुक असून त्याकरिता शासनाची मान्यता लागते या मान्यतासाठी दिरंगाई होत आहे तरी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सीएसआर फंड वापरण्याकरिता मान्यता मिळवून द्यावी अशा आशियाचे दोन निवेदने आदरणीय मंत्री महोदय यांना दिले असता त्यांनी तात्काळ सोलापूरचे आधिष्ठाता संजीव ठाकूर यांना सूचना केल्या सीएसआर फंड वापरण्याची मागणी असेल तर प्रस्ताव पाठवून द्यावेत त्याला शासनाकडून तात्काळ मान्यता दिली जाईल तसेच नवीन एम आर आय मशीनसाठी ही प्रस्ताव द्यावा डीपीडीसी किंवा राज्य शासनाच्या निधीतून लवकरात लवकर एम आर आय मशीन उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण ज्येष्ठ नेते शफी इनामदार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम अँड,सलीम नदाफ युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय सेवा अध्यक्ष बसवराज कोळी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार कार्याध्यक्ष कांचन पवार, प्रकाश झाडबुके, आयुब शेख, मोहीन मुल्ला, किरण शिंदे, मनोज शेरला, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे जहीर शेख किरण आवताडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *