बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

 

राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगायत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा झाला गौरव

मेट्रो सोलापूर – बसव ब्रिगेडतर्फे राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी सोलापूरातील टाकळीकर मंगल कार्यालयात थाटात झाले बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित होते याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सतूबर, भाऊसाहेब सगरे खलिल शेख, सचिन सोनटक्के, संतोष वायचळ, पुरस्कार समितीचे स्वागताध्यक्ष उद्योजक ॲड. सोमेश्वर वैद्य, कार्याध्यक्ष सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड, बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे उपस्थित होते.

बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला याप्रसंगी डॉ. अमरनाथ सोलापूरे (बीदर, कर्नाटक) यांना जीवनगौरव पुरस्काराने तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ ॲड. विश्वनाथ पाटील, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे, अध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार (लातूर ), उद्योजक मल्लिनाथ अक्कळवाडे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शशिकांत पुदे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉ. प्रतिभा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, फेटा आणि मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, उपाध्यक्ष ॲड. विजय शिंदे, सचिव ॲड. मनोज पामूल, सहसचिव ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट, सुजाता शास्त्री, डॉ. वैजिनाथ कुंभार, शाम धुरी, विनायक साळुंखे, मकबुल मुल्ला, नीता स्वामी, संपन्न दिवाकर यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने म्हणाले, बसवरत्न पुरस्कार मिळालेल्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कार्य उत्तुंग असून समाजातील चांगल्या कामाचा गौरव बसव ब्रिगेडतर्फे आणि सोनाई फाउंडेशनतर्फे केला जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता बसव ब्रिगेडच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांनी दिले.

जुळे सोलापुरात लिंगायत भवन बांधण्यासाठी आ. यशवंत माने यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाकडून ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. जागेची उपलब्धता झाल्यानंतर त्वरित याबाबतचा निधी मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी याप्रसंगी सांगितले.
बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे यांनी प्रास्ताविक केले ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर शिवराज विभुते यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी बसव ब्रिगेडचे शिवराज विभुते, बसवराज चाकाई, राहुल जत्ती, ॲड. विनयकुमार कटारे, जतीन निमगाव, सिद्धांत रंगापुरे, सुधाकर कोरे, सिद्धाराम छपेकर, स्वप्नील नष्टे, पंडित जळकोटे, शरणकुमार कुंभार, नितीन गंगदे, अविनाश बिराजदार, भरत कुरणे, योगीराज किणगी, दत्ता केरे, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

⏹️ ⏹️ ⏹️ ⏹️ ⏹️

लिंगायत भवनसाठी शासनाकडून घेणार १० गुंठे जमीन 

जुळे सोलापुरात लिंगायत भवन व्हावे याकरिता बसव ब्रिगेड प्रयत्न करीत आहे याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून लिंगायत भवन करिता १० गुंठे जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन उद्योजक ॲड. सोमेश्वर वैद्य यांनी याप्रसंगी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *