अनुभव प्रतिष्ठानचे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर

 रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा

मेट्रो सोलापूर – अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 4.30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी दिली. श्रावण मास निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे रविवारी सोलापूरातील शिवस्मारक सभागृह, नवी पेठ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव नरुणे सेवानिवृत्त
विक्रीकर उपआयुक्त अनिल सोलनकर प्रबंधक,स्टेट बँक ऑफ इंडिया,ईश्वर गिडवीर व्यवस्थापक (F&A),MSEB,
कु. गार्गी देशपांडे डेप्युटी मॅनेजर, एचडीफसी बँक.
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सर्व सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष महेश भाईकट्टी ,शिवानंद नागणसुरे, गणेश येळमेली, सोमनाथ कालदीप,संतोष शिवशिंपी,महेश कासट,शिवानंद भाईकट्टी,मंगेश कुलकर्णी,गणेश कालदीप,सचिन लोणी,गणेश सुरवसे यानी केले आहे.

⏹️ पुरस्काराचे मानकरी ⏹️

प्रकाश सनपूरकर ( पत्रकार) अभय देशमुख (उद्योजक) गुरुलिंग कनूरकर (समाजसेवक) ऐश्वर्या सलगर (नृत्यकला) डॉ.आशुतोष यजुर्वेदी (डॉक्टर) प्रतिभा कालदीप (शिक्षक) मनोज अलकुंटे (डेव्हलपर) आशिष कुलकर्णी (GST विभाग) श्रद्धानद पुजारी ( वकील) सुषमा इंगळे (महिला पोलीस) सुमित कुडल (IT) आदी या पुरस्काराचे मानकरी असून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *