एल.बी.पी.एम.महाविद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केले अभिवादन…

 

मेट्रो सोलापूर – सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपप्राचार्य प्रा.देवराव मुंडे यांनी दोनही महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी डॉ. किशोर पवार, प्रा. भक्तराज जाधव, डॉ. आनंद शिंदे, डॉ. प्रदीप जगताप, प्रा. संतोष मारकवाड, डॉ. अशोक भोंग, प्रा. रवी धोंगडे, प्रा. योगेश जाधव, प्रा. दिपाली सातपुते, प्रा. नीता भास्कर आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *