साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसने केले अभिवादन

 

मेट्रो सोलापूर – समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जाज्वल्य साहित्य समाजात मांडून त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरी बाण्याने स्फूरण दिले साहित्य,संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगातील एक अग्रगण्य असे व्यक्तिमत्व,ज्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी आपल्या परखड लेखणीचा वापर केला अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जेष्ठ नेते बिज्जू अण्णा प्रधाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, अनिल उकरंडे, प्रकाश जाधव,राजू बेळ्ळेनवरू, सुजित अवघडे, लताताई ढेरे, तुषार जक्का, दत्तात्रय बडगंची, अँड सलीम नदाफ,अनिल छत्रबंद,शामराव गांगर्डे, इरफान शेख, डाॅ संदीप माने, बसवराज कोळी, कांचन पवार, सुरेखा घाडगे, प्राजक्ता बागल, मार्तंङ शिंगारे, आदी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *