‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनाही कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री शिंदे 

 

मेट्रो सोलापूर – छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण ” अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने’ चा शुभारंभही यावेळी करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख महिलांना या योजनेचा लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे व लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय असून , त्यादृष्टीने महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना देऊन आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *