ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाट्यगृह उभे पुन्हा राहणं हे महत्त्वाचं… हुबेहुब नाट्यगृह युद्धपातळीवर उभारणार

मेट्रो सोलापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले हे नाट्यगृह कोल्हापूरात भक्कमपणे उभारलेले होते, या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांच जिव्हाळ्याचं नातं होतं या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे आगीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना केली 

 यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना घडली असून हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल,यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला. 

सदरील दुर्घटनेची फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग याबाबत चौकशी सुरु केली आहे नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यानी दिले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *