‘आस्थाची’ नागपंचमी निराधार,एचआयव्ही बाधीत महिला व अनाथ मुलींसोबत साजरा

मेट्रो सोलापूर – श्रावण महिना पवित्र व व्रत वैकल्याचा मानला जातो तसेच विविध सणानिमित्य आणखी ही उत्सुकता वाढते त्यातल्या त्यात नागपंचमी हा मुलींचा व महिला वर्गाचा आवडता सण आदल्या दिवशी उपवास करुन भगवान शिवाचे लाडके वासुकी अर्थात नागदेवताचे पुजा व उपवास करुन भावाला व कुटुंबाला सौख्य मागणा-या माता भगिनींचा हा सण शृंगाराशिवाय अपुर्णच जिथे प्रत्येक घराघरात मेंहेंदीकोन , बांगडी , टिकली, नेलपेंट,मोती माळ,हेअरबँड पिना, काजळ, हात रुमाल, ह्यांचा समावेश असतोच असतो परंतु आजही समाजात असे काही महिला वर्ग आहेत ज्यांना यांपासुन वंचित राहावे लागते अशा वंचितांसाठीच आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमाअंतर्गत नागपंचमी सणनिमित्त आज सोलापुरातील बेघर निवारा केंद्र व मंगलदृष्टी निराधार महिला आश्रम, क्रांती महिला संघ एचआयव्ही संघटना व अनाथ मुलींना, तसेच स्मशानभूमित काम करणारे व कुष्ठरोग पिडीत महिलांकरिता शृंगार किट वाटप केले त्यात मेहेंदी कोन , नेलपेंट, टिकली,माळ,क्लच,बांगडी, काजळ, हात रुमाल, आदिंचा समावेश होता तसेच मिठाई वाटप ही करण्यात आले एक आगळेवेगळे नियोजन करत एकाच वेळी सोलापुरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी शृंगारकिट वाटप तसेच बार्शीतल्या एच आय व्ही पिडीत महिला ज्यांनी देहविक्री करून उदरनिर्वाहसाठी केलेल्या पिडितांसाठी तसेच सात रस्त्यावरिल वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना शृंगार किट व मिठाई वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन विजय छंचुरे यांनी केले याचबरोबर संस्थेच्या महिला सभासदांनी त्यास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे टीम नीलिमा हिरेमठ,छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, कांचन हिरेमठ, स्नेहा मेहता, विद्या माने, नीता अकुर्डे, संगीता छंचुरे,अनिता तालीकोटी, कल्पना कांबोज, सुरेखा पाटील, सुवर्णा पाटील, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, रेणुका जाधव, संपदा जोशी, पुष्कर पुकाळे, अविनाश माचरला, विजय छंचुरे यांच्या उपस्थितीत हा अनोखा असा नागपंचमी सण साजरा करण्यात आला.सोलापुरात कुठलेही जात-भेद न मानता आस्था रोटी बँक नेहमी गोरगरीब गरजू लोकांना मदतीचे हात पुढे करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *