पोटे दांपत्यांचा मानवतेचा लळा आजही अविरतपणे सुरू

पुणे : आजच्या व्यक्तीगत धकाधकीच्या जीवनात मनुष्याला स्वतःला द्यायला वेळ नाही तिथे मोकाट प्राण्यांना कोण असणार वाली …? तरीही समाजात आजही पुण्यासारख्या मेट्रो शहरातील येवलेवाडीला भाड्याच्या घरात राहणारे पोटे दांपत्याचे प्राण्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नसून आजही त्यांच्या घरात पाळीव प्राण्याप्रमाणेच अपाळीव ( मोकाट ) असे तब्बल तीसहुन अधिक कुत्र्यांना व चार पाच मांजराना दोन वेळचे ताजे आहार ( खाद्य ) न चुकता खाऊ घातले जाते .
साधारण वीस वर्षापूर्वी श्री प्रकाश पोटे व सौ शोभना पोटे यांची मुलगी अपर्णा शाळेतून येतांना एक कुत्र्याचे पिल्लू शालेय दप्तरात घरी घेऊन आली लेकीच्या या अनोख्या प्रेमामुळे या दांपत्यालाही प्राण्यांच्या प्रती ओढ निर्माण झाले आणि तिथून हा मानवतेचा लळा आजही अखंडपणे सुरू आहे. पालनपोषण व आहाराबरोबरच समाजातील भटके कुत्रे असो वा मांजर त्यांच्या तब्येतीची जबाबदारीही घेऊन स्वतः काळजीपूर्वक दवाखान्यातील औषधोपचारासह सुश्रुषा करतात गरजेनुसार काही कुत्रे व मांजरावर यशस्वी शस्त्रक्रियाही केले आहेत. पुणे परिसरातील काही दवाखान्यातील डॉक्टर व इतर कर्मचारीही शक्य होईल तेवढी मदत करत असल्याचे पोटे यांनी सांगितले स्वताचे खाजगी वाहनाची वाहतूक करून उदरनिर्वाह करणारे प्रकाशजी पोटे हे व घरकाम करत इतर सामाजिक संघटनांचे काम करणाऱ्या शोभना पोटे हे कोणाकडूनही कसलाही आर्थिक मदत घेत नसून त्यांचा मुलगा अभिजित दरमहा यांच्या या आदर्शनिय कार्यासाठी अर्थसहाय्य करत आहे .
समाजात पोटे कुटुंबाचे प्रशंसनीय व अनुकरणीय कामाची प्रेरणा घेऊन मोकाट प्राण्यांना भुकेचा एखादा घास भरवावा हीच अपेक्षा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *