सोलापूर ते उजनी दुहेरी समांतर जलवाहिनी कामकाज युद्ध पातळीवर सुरू

सोमपा आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केली कामाची पाहणी.

सोलापूर : उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या काम युद्ध पातळीवर सुरू असून आज आयुक्त शीतल तेली – उगले यांनी अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे,पोचमपाडचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश, विजयकुमार नलावडे,आरुण पाटील,देविदास मादगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते दुहेरी जलवाहिनीचे हे संपूर्ण काम नोव्हेंबर 2024 पर्यंत होणे अपेक्षित असून त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे सदर ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या पाईपची कोटिंग,पाईपची उंची,पाईपची लांबी, जॅकवेल, जॅकवलेचे चॅनल, दुबार पपिंग तसेच पाईपलाइन टाकताना ज्या ठिकाणी अडथळे आहेत त्याची सुद्धा आयुक्त यांनी पाहणी केली जॅकवेलच्या कामासाठीची 60 टक्के खोदाई पूर्ण झाली आहे त्याचबरोबर जलवाहिनी टाकण्यासाठी पाईपही पुरवठा केले जात आहेत,सदर योजने अंतर्गत सोलापूर शहरास दररोज 170 MLD पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्व धरण क्षेत्रात जॅकवेल बांधने, पंपिंग मशीनरी,रायझिंग मेन, बी. पी.टी, ग्राविटी मेन इत्यादी कामाचा समावेश करण्यात आले असून त्याचे काम युद्ध पातळी वर असल्याची माहिती सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *