सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार घेणारे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
२०११ मध्ये, नागरी सेवेची तयारी सुरू केलेले कुमार आशिर्वाद यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले व पाचव्यांदा 2016 बॅचचे 176 IAS उत्तीर्ण होऊन सहाय्यक सचिव म्हणून नियुक्त झाले.
महाराष्ट्रातील दुर्गम व आदिवासी अशा भागातील गडचिरोली जिल्ह्यात तरुण तुर्क मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवला असून आता सोलापूरला तरुण तूर्क जिल्हाधिकारी म्हणून लाभणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *