दरड कोसळली…ईसाळवाडी ओशाळली…

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ईसाळवाडीच्या वसाहतीवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली असून यामध्ये शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरु असून आतापर्यंत २७ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे रस्ता नसला तरी मदतकार्य युध्दपातळीवर सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *