सामाजिक सौहार्दतेसाठी युवकांची पाऊले ग्रंथालयाकडे वळणे गरजेचे : प्रा. रवी धोंगडे

“एल.बी.पी.एम.” महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

सोलापूर : सोलापूरातील सातरस्ता येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची दि. १२ ऑगस्ट रोजी असलेल्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते भारतात ग्रंथालय चळवळ रुजविण्यासाठी व ग्रंथालय शास्त्राच्या प्रगतीसाठी रंगनाथन यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे त्यांचा जन्मदिवस हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी ग्रंथपाल प्रा. रवी धोंगडे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, वाचनसंस्कृतीतूनच मानवी समाज सुसंकृत होण्यास मदत होते. वाचनातून येणारी वैचारिक प्रगल्भता हीच मानवाला सभ्य बनवते त्यामुळे सामाजिक सौहार्दता निर्माण होण्यासाठी युवकांची पाऊले ग्रंथालयाकडे वळायला हवीत धोंगडे यांनी यावेळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी डॉ. महादेव कोरी, डॉ. अनिल कांबळे, डॉ. विजय रेवजे, प्रा. दशरथ रसाळ, प्रा. मोहन चव्हाण, डॉ. नागोराव भुरके, प्रा. संतोष मारकवाड, प्रा. नितेश गांगवे, प्रा. शैलेंद्र सोनवले, प्रा. अमोल मोरे, प्रा. किरण भोसले, शशांक बिराजदार, योगेश पोळ, नियाज शेख याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *