सोलापूरात या ठिकाणी असणार नो डिजिटल झोन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील होर्डिंग, फ्लेक्स परवानगी बाबत सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ७ सप्टेंबर रोजी बैठक घेतली होती त्या अनुषंगाने आज सोलापूर शहरातील डिजिटल फ्लेक्स बैनर प्रिंटिंग असोसिएशन यांची मीटिंग आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, शिवराज झुंजे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील अनधिकृत होर्डिंग ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्यांनी तीन दिवसाच्या आत काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले , अन्यथा सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत त्वरित कारवाई करण्यात येईल तसेच सोलापूर शहरात फ्लेक्स डिजिटल बैनर लावण्याकरिता लवकरात लवकर जागा निश्चिती करून त्यासंदर्भातली माहिती महापालिकेच्या वतीने प्रसिद्धी करण्यात येईल अशी माहिती आयुक्ता शितल तेली – उगले यांनी दिली.

■ सोलापूर शहरातील नो डिजिटल झोन क्षेत्र ■

1) डाक बंगला व सात रस्ता परिसर
2) रेल्वे स्टेशन परिसर
3) भैय्या चौक
4) छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी स्टॅन्ड
5) सम्राट चौक ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान )
परिसर
6) टिळक चौक परिसर
7) अशोक चौक परिसर
8) चार पुतळा परिसर
9) डफरीन चौक कै. शंकरराव चव्हाण पुतळा
परिसर
10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
( पार्क चौक )

उपरोक्त ठिकाणी ” नो डिजिटल झोन ” क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे सदर ठिकाणी नागरिकांनी डिजिटल फ्लेक्स बैनर लावू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तरतुदी प्रमाणे संबंधीतावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सोमपा आयुक्तांनी यावेळी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *