आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

सोलापूर : मानवाच्या उत्क्रांतीत अक्षरज्ञान आणि लिहिणे व वाचण्याच्या कलेने महत्त्वाची भूमिका बजावली असून साक्षरतेमधूनच एका स्थिर आणि शांततापूर्ण समाजाची पायाभरणी होऊन तो समाज सशक्त आणि विकसित होण्यासाठी मदत होते.
असा सूर रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या चर्चासत्रात उमटला व्यासपिठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य देवराव मुंडे, डॉ. दशरथ रसाळ उपस्थित होते.या चर्चासत्रात साक्षरता आणि राष्ट्राचा विकास, शैक्षणिक व सामाजिक सुधारणा चळवळ, स्त्रिया, शेतकरी आणि कष्टकरी वर्गांसाठी साक्षरतेचे महत्व या विषयावर अनुराधा भूताले, रईसा पठाण, अर्चना गुडशेल्लू , महालक्ष्मी चलवादी, सुष्मिता सुरवसे या विद्यार्थिनींनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
चर्चासत्राचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.संतोष मारकवाड यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. नितेश गांगवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *