भाजपा ( पंचायतराज व ग्राम ) विभागाकडून १०१ डस्टबिन वाटप

अक्कलकोट : भारतीय जनता पार्टी ( पंचायत राज व ग्राम विकास ) विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचि वाढदिवस तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत समर्थ नगर ग्राम पंचायत,अक्कलकोट मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेश हिंदोळे यांच्या हस्ते १०१ नागरिकांना डस्ट बिन वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना महेश हिंदोळे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभयानांतर्गत राबवत असलेले कार्य विस्तृत प्रमाणात सांगितले त्यामुळे भारतामध्ये स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेले आहे.
प्रास्ताविकामध्ये सोलापूर जिल्हा सहसंयोजक रविंद्र वाघमोडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना व कार्य भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभागाकडून होत असलेले कार्याबद्दल उपस्थित नागरिकांना माहिती सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेराव वडले यांनी केले
यावेळी शहर संयोजक शिवशंकर चनशेट्टी, दत्तात्रय कोकने, योगीराज हिरेमठ, मोनेश नरेगल, उदय नरेगल, रवी मंगरुळे, अभिजीत पवार, संजय राठोड, अप्पू दूधगी,संतोष पत्तर्गे, गोटू दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *