हमाल, मापाडी, महिला माथाडी कामगारांच्या न्याय मागण्यांचे कामगार आयुक्तांना निवेदन

सोलापूर : सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे हमाल मापाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हालगी मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व हमाल मापाडी कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ते प्रश्न जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त तथा चेअरमन माथाडी बोर्ड सोलापूर त्वरित सोडविण्यासाठी आज आम्ही जिल्हा मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या आहेत त्या मागण्यांचे अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे.
१) जिल्ह्यात माथाडी हमाल कायद्याची अंमलबजावणीतील अनागोंदी व मनमानी कारभार तात्काळ थांबवून कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार या कायद्यातील शब्द प्रयोगाकडे आवर्जून लक्ष वेधावे या कायद्याची जिल्ह्यात सार्वत्रिक अंमलबजावणी झाली पाहिजे २) गेल्या १० ते १५ वर्षामध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी कर्मचारी यांच्या रिक्त जागी नवीन नेमणूक केलेल्या नाहीत. सबब माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणारी सक्षम यंत्रणा कोलमडली असल्याने हमाल तोलाईदार माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही कायद्याची अंमलबजावणी होत नाही.
(अ) जिल्हा माथाडी मंडळामध्ये चार निरीक्षकांचे नेमणूक करण्यात यावी ब) जिल्हा माथाडी मंडळातील रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन नेमणूक / भरती त्वरित करणेबाबत शासनाकडे मागणी करावी ३) जिल्हा माथाडी मंडळाकडे निरीक्षक व कर्मचारी यांची नव्याने भरती करताना जिल्हा माथाडी मंडळाकडील नोंदणीकृत हमाल- तोलाईदार महिला माथाडी कामगारांच्या मुला – मुलींची प्राधान्याने भरती करणे सक्तीचे करावे व त्यांची भरती करावी ४ ) जिल्हा माथाडी मंडळ सक्षम होण्यासाठी स्थानिक माथाडी मंडळावर शासन नियुक्त हमाल व मालक प्रतिनिधी सदस्य यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात ५ ) जिल्हा माथाडी मंडळावर कामगार / हमाल प्रतिनिधींची नियुक्ती करताना खऱ्या हमाल संघटना प्रतिनिधी व खऱ्या कार्यरत हमालांच्या नियुक्त्या कराव्यात ६) जिल्ह्यातील हमाल मापाडी /तोलाईदारांचे पगार वेळेवर करण्यात यावेत. वेळेवर पगार न भरणाऱ्या मालक, व्यापारी, आडती यांच्यावर कायद्यानुसार खटले दाखल करण्याचे आदेश निरीक्षकांना द्यावेत ७) वैद्यकीय उपचार जिल्हा माथाडी मंडळाकडून मिळणेसाठी सध्याच्या लेव्ही दरामध्ये किमान दरात वाढ करून लेव्हीचे दर ३५ टक्के करावेत ८ ) हमाल-तोलाईदार-महिला माथाडी कामगारांना म्हातारपणातील जीवन सुखकर होण्यासाठी किमान ३ हजार रूपये मासिक पेन्शन तात्काळ सुरू करण्याची माथाडी बोर्डाकडून शासनाने मागणी करावी ९ ) जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली शासकीय धान्य गोदामामधील हमालांना कायद्यानुसार सक्तीची व हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळावी १०) माथाडी बोर्डाकडे नवीन नोंदणी कामगारांसाठी नोंदणी करण्यासाठी पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील अर्ज माथाडी मंडळाकडे दाखल केले असून सुद्धा अजूनपर्यंत त्यांची नोंदणी केली नाही तरी ते त्वरित करून घेण्यात यावी ११) पंढरपूर येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील परोपरांगत काम करीत असणाऱ्या कामगारावर होणारा अन्याय कदापीही सहन करून घेतला जाणार नाही १२) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,पंढरपूर येथील हमालांचे कामकाजाबाबत २०१९ मध्ये तात्कालिन माथाडी मंडळाचे अध्यक्ष यांचे समोर बैठका होवुन सविस्तर चर्चा होवुन दि. १/२/२०१९ रोजी अंतिम चर्चा होवून हमाली कामाचे नियोजन झाले व मा. अध्यक्षांनी दि. ६/२/२०१९ रोजी हमाली कामाचे वाटप नियोजन केले आहे तसे जा.क्र. सकाआ/माथाडी मंडळ / ७०१ चा आदेश हि पारित केले आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी संघटनेचे ऐकुन त्यांच्या दबावाखाली वखार महामंडळातील हमाली कामकाज वाटपाची सुनावणी आपण सुरु केली आहे. वास्तविक याबाबत आपल्याच माथाडी मंडळाने दि. ६/२/२०१९ रोजी निर्णय झालेला असताना पुन्हा सुनावणी घेणे चुकीचे आहे. तरी याबाबत कोणताही फेरनिर्णय घेण्यात नये अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल.१३) जिल्ह्यातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी माथाडी बोर्डातील कर्मचाऱ्यानी वेळोवेळी भेट देऊन पगार न भरणाऱ्या कामगारांना व व्यापारी, आडती यांच्यावर नियंत्रणठेवणे गरजेचे आहे व सर्वांचे पगार माथाडी बोर्डाकडूनच झाले पाहिजेत.१४) माथाडी बोर्डातून पुर्वीप्रमाणे तीन महिन्यातून सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीची चेअरमन बरोबर बैठक व्हावी. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल.
१५) १) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व अडत व्यापाऱ्यांच्या – माथाडीत नोंदी करून घेणे २) बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्यांकडे बिगर नोंदीत कामगार काम करतात हे कामगार माथाडी बोर्डात नोंदीत नसल्यामुळे या कामगारांचा माथाडीत भरणा होत नाही. कामगारांची लेव्ही बुडवून रोखीने पगार दिली जाते त्यामुळे सर्वे करून बिगर नोंदित कामगारांची माथाडीत नोंद करावी ३) बाजार समितीमध्ये माथाडी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी.
यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे
जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे राजकुमार घायाळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ भिमा सिताफळे उपाध्यक्ष संतोष सावंत सचिव सुभाष लोमटे सरचिटणीस अॅड. राहूल सावंत उपाध्यक्ष,सुखदेव चव्हाण खजिनदार ,सुरेश बागल उपाध्यक्ष,गोरख जगताप उपाध्यक्ष,सिद्ध हिप्परगी सहखजिनदार दत्ता मुरूमकर सहसचिव, चांदा गफार संघटक शिवानंद पुजारी संचालक बाजार समिती सोलापूर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *