श्री सुवर्णसिध्देश्वर कार्यास आर्यन्सची दीड कोटीची देणगी श्री सिध्देश्वर देवस्थानकडे जमा

सोलापूर : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानला श्री सुवर्णसिद्धेश्वर या संकल्पनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देणगी म्हणून दिलेली दीड कोटी ही रक्कम श्री सिध्देश्वर देवस्थानच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा झाले.सोलापुरात डोणगाव रस्त्यावर माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेले सोलापूरचे फर्स्ट आयटी पार्क आयटी पार्कच्या भूमिपूजनाचा सोहळा अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्या हस्ते झाला होता. त्या समारंभात आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त देणगी म्हणून दीड कोटी श्री सिध्देश्वर देवस्थानास दिली होती सदरची रक्कम शुक्रवारी देवस्थानच्या बँक खात्यावर जमा झाली असून याबद्दल श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी देवस्थानच्यावतीने आणि श्री सिध्देश्वरभक्तांनी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी जगताप यांना धन्यवाद दिले आहेत या कार्यात माजी महापौर महेश कोठे यांचा मोठा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *