दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरला मानाचा तुरा…

सोलापूरातील राजराजेश्वरी प्रशालेचा डंका

नवी दिल्ली : सोलापुरातील विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेतील रितू अण्णा कलबुर्गी या विद्यार्थीनींनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या ‘शैवाल क्लिनिंग मशीन’ या विज्ञान उपकरणांची राष्ट्रीय स्तरावरील अतिउत्कृष्ट साठ नावीन्यपूर्ण उपकरणांच्या गटात निवड झाली आहे.पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांच्या हस्ते कलबुर्गीला प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आला यावेळी राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख नमिता गुप्ता उपस्थित होत्या महाराष्ट्रासह सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर दि.९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन पार पडली प्रशालेतील रितू कलबुर्गी या विद्यार्थीनीने शैवाल क्लिनिंग मशीन हे विज्ञान उपकरण राष्ट्रीय स्पर्धेसाठी मांडलेली होती. देशभरातून ५४५ तर महाराष्ट्रातून २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.


‘शैवाल क्लिनिंग मशीन’ हे उपकरण कमी खर्चिक व वेळ वाचविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पावसाळ्यात ओलसर जागी भीतीवर अथवा फरशीवर शैवाल निर्मिती होते ती काढण्यासाठी उपयोग होतो मशीनच्या साह्याने औषध फवारणी केल्यामुळे कायमचा शैवाल निघून जाण्यासमदत होते फरशी वरील शेवाळ देखील दूर करण्यास मदत होते कोणत्याही प्रकारचा स्पर्श न करता सोप्या पद्धतीने काढु शकतो कमी पाण्यात व कमी वेळेत हे स्वच्छ करता येते सदर उपकरणाची निर्मिती केल्याने समाजात सर्व स्तरातून रितूचे कौतुक होत आहे.
प्रशालेचे विज्ञान शिक्षक शितल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *