सभासदांची दिवाळी होणार गोड भीमा देणार २० रुपये किलोने साखर – चेअरमन विश्वराज महाडिक

मयत सभासदांच्या वारसांना सुद्धा दिवाळी साखर
‘ सभासदांसाठी आकर्षक २५ किलो पॅकिंग बॅगेत

टाकळी सिकंदर : भीमा सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळीसाठी सभासद शेतकऱ्यांना २० रुपये प्रति किलो
दरात साखर वाटप सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारख्यान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली. साखर वाटपात सुलभता येण्याकरिता फक्त सभासदांसाठी २५ किलो साखरेचे बॅग पॅकिंग करण्यात आले आहे. तसेच सभासदांमध्ये कोणताही भेदाभेद न करता मयत सभासदांच्या वारसांसह सर्वच सभासदांना दिवाळी साखर देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील विश्वराज महाडिक यांनी दिली.
साखरेचा जागतिक बाजारपेठेतील व देशातील विक्री दर वाढले असल्याचा दाखला देत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सभासदांशी असणारा ऋणानुबंध जपत २० रुपये प्रति किलो दराने साखर देत सर्वांसमोरच एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अगदी चेअरमन पदाची जबाबदारी मिळाल्यापासूनच विश्वराज महाडिक यांनी अनेक सभासद हिताचे निर्णय घेत आपल्या कार्यशैलीने सर्वांनाच आश्वस्त केले आहे. यावेळी विश्वराज महाडिक यांनी इतर कारखान्यांच्या तुलनेत सभासदांना ५ ते १० रुपये स्वस्तात साखर उपलब्ध करून देत दिवाळीचा गोडवा तर वाढवला आहेच पण होऊ घातलेल्या हंगामापूर्वी चांगलीच साखरपेरणी देखील केली आहे. आपल्याच ऊसापासून तयार झालेली गोड साखर आपल्या घरचा दिवाळी फराळ गोड करणार या भावनेतूनच यावर्षीचा ऊस देखील सभासद भीमालाच गाळपास देणार असा आशावाद देखील विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला.यावर्षी ऐन नवरात्रोत्सवातच दिवाळीसाठी देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप करण्यात येत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गट ऑफिसवर बुधवार दिनांक १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधी मध्ये सकाळी १० ते सायं ५ या वेळेत सभासद साखरेचे वाटप केले जाणार आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांनी दिवाळी साखर संबंधित गट ऑफिसवरून घेऊन जाण्याचे आवाहन चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केले आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *