वृक्ष संवर्धन हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : तृप्ती पुजारी

पद्मशाली सखी संघम आणि सोमपा पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम !

‘सेल्फी विथ ट्री’ वृक्षारोपण स्पर्धेचे बक्षीस वितरण

सोलापूर : आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे वाढते तापमान रोखण्याकरिता पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे ते प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सहाय्यक महसूल अधिकारी तृप्ती पुजारी यांनी येथे केले.
      श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघम आणि सोमपा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ वृक्षारोपण स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी सहाय्यक महसूल अधिकारी तृप्ती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी मंचावर श्री स्वामी समर्थ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा यलगुलवार , सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सल्लागार प्रशांत जोशी, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का, नरेंद्र धारा, नागेशकुमार गंजी, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, सोमपा पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
       सोलापूर शहरातील  लहान मुली, युवती व महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आलेल्या फोटो मधून मान्यवरांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला प्रास्ताविक ममता मुदगुंडी यांनी तर सूत्रसंचालन कला चन्नापट्टण यांनी केले. कार्यकारिणी सदस्य प्रभू वारशेट्टी यांनी आभार मानले. याप्रसंगी संगीता रॅकम, दर्शना सोमा, सुरेखा गोली , सुरेखा भीमनपल्ली, सुरेखा क्षीरसागर, पल्लवी संगा, आरती बुधाराम यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार, महिला व मुली उपस्थित होत्या.

बक्षिसाचे मानकरी

प्रथम क्रमांक – अस्मिता मुदगुंडी (ट्रव्हल बॅग’ ), द्वितीय क्रमांक – अरिता ईप्पलपल्ली (सँडविच टोस्टर’ ) , तृतीय क्रमांक – कल्याणी कुरापाटी (टोस्टर’)  तर, उत्तेजनार्थ – ममता तलकोक्कुल, लता मुगडयाल, देवांशी कुरापाटी (लेडीज छत्री’) आदी. तसेच प्रत्येक स्पर्धकाला सहभाग ‘प्रमाणपत्र’ देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *