‘ बार्टी ‘ शासकीय विविध योजनांवर सोनकांबळेंचे व्याख्यान संपन्न

सोलापूर : सोलापूरातील शिवदारे महाविद्यालयात बार्टी समाज कल्याणच्या वतीने शैक्षणिक शासकीय योजना या विषयावर मा.प्रणिता सोनकांबळे मॅडमचे व्याख्यान महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सुत्रावे सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बार्टी समाज कल्याण प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना समाज कल्याण खात्याअंतर्गत शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना याची सविस्तर माहिती व्याख्यानातून दिली, बार्टी कार्यालय आणि सामाजिक न्याय विभागात असणाऱ्या विविध योजनाची सविस्तर माहिती दिली.तसेच त्यांनी असे आपल्या व्याख्यान मधून असे सांगितले की शासन विविध योजना लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असते याचा लाभ लाभार्थींने घेतला पाहिजे.या प्रसंगी याप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य डॉ.डी.एस.सुत्रावे सरांनी अध्यक्षीय भाषण करताना समाज कल्याण विभागातील विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन घडविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.बी. कांबळे प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.संगीता बावगे ,प्रास्ताविक एसी.एस टी.स्टँडिंग कमिटीचे समन्वयक प्रा. सी.पी.उमरजकर केले तर आभारप्रदर्शन कु.स्न्हेल सरवदे या विद्यार्थिनीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *