” डोहतळ ” काव्यसंग्रहाला शांता शेळके साहित्य पुरस्कार जाहीर

डोहतळ ही कवी कटकधोंड यांची रचना

सोलापूर : कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान मंचर – पुणेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी सोलापूरचे ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ” डोहतळ “या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याची माहिती कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायमोडे यांनी दिली पुरस्काराचे वितरण २३ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
” डोहतळ ” या काव्यसंग्रहाला यापूर्वी साहित्यातील सन्मानाचे १९ पुरस्कार मिळालेले असून कवी मारुती कटकधोंड यांनी माणूस हा कवितेचा केंद्रबिंदू मानून माणसाच्या जगण्याचे चित्रण या काव्यसंग्रहात शब्दबद्ध केले आहेत. उपेक्षित शोषित आणि पीडितांच्या वेदनांचे दर्शन सदर काव्यसंग्रहातून घडवले आहे या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सोलापूर महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष व उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, मसाप शाखा जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, मसाप शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ.श्रुती वडकबाळकर, हिराचंद नेमचंद वाचनालयचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर, साहित्यिक योगीराज वाघमारे, राजेंद्र दास, ज्येष्ठ कवी माधव पवार, राजेंद्र भोसले, गिरीश दूनाखे, बदीउज्जमा बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *