केगाव येथे शुक्रवारी सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे नूतन शहर
अध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांची माहिती

सोलापूर :  वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ( अधिवेशन ) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023-24 कुस्ती स्पर्धेकरिता सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता केगाव येथे केले आले असल्याची माहिती सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे नूतन शहर अध्यक्ष आ. विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि केगाव जोशी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर कुस्ती निवड चाचणी स्पर्धा प्रौढ पुरुष माती व गादी कुस्ती विभागात होणार आहे. पुरुष माती व गादी या निवड चाचणीत 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गट ( 86 ते 125 किलो) असे वजन गट असणार आहेत तसेच कुमार केसरी निवड चाचणीत 45,48,51,55,60,65, 71,80,92,110 असे वजन गट असून या स्पर्धेकरिता येणाऱ्या सर्व मल्लाचे वजन दि. 27 ऑक्टोबर 23 रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत होतील उशीरा येणाऱ्या कुस्तीगीरांची वजने घेतली जाणार नाहीत तर त्याच दिवशी सायंकाळी ठीक 4 वाजता प्रत्यक्ष कुस्ती निवड चाचणी स्पर्धेस सुरुवात होणार आहे सोलापूर शहरातील पात्र व ईच्छुक पैलवानानी वजनासाठी येतांना २ कलर फोटो व आधार कार्डाची मुळ प्रत आणि एक झेरॉक्स प्रत आणणे अनिवार्य आहे सोलापूर शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शहरातील जास्तीत जास्त मल्लानी भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी आयोजन समितीचे अमर दुधाळ  (9372623717)  व संयोजन समितीचे पै. दादा सरवदे ( 7887551010) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *