भवानी पेठ पाणी गिरणीत नवीन पंप बसवणार…

सोलापूर : सोलापूरातील गावठाण व हद्दवाढ भागाचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी माजी नगरसेवक भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी केलेला पाठपुरावा आणि आ. विजय देशमुख यांच्या शिफारशीनुसार गावठाण सह हद्दवाढ भागांच्या पाणीपुरवठ्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 98 लाख रुपयाच्या निधीतून नविन पंप भवानी पेठ पाणी गिरणी येथे बसवण्यात येणार आहेत.
दोन कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चातून 240 एचपी च्या दोन मोटारी व दीडशे एचपी च्या तीन मोटरी भवानी पेठ पाणी गिरणीत बसवण्यात येणार आहे या नवीन मोटारी पाणी गिरणीत कारणीत झाल्यानंतर घोंगडे वस्ती, बलिदान चौक ,चाटी गल्ली, पुर्व मंगळवारपेठ, बुधवार पेठ, कस्तुरबा मंडई परिसर, शाहीर वस्ती, भवानी पेठ परीसर, शेळगी, दहिटणे, विडी घरकुल परिसर आदी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे या भागात सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने व या पाणी गिरणीत मोटारी सतत बंद पडत असल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत होता नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आमदार विजयकुमार देशमुख यांनी पंधराव्या वित्त आयोगातून या कामासाठी दोन कोटी 98 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गुरुवारी आमदार विजय देशमुख यांनी भवानी पेठ पाणी गिरणी सदिच्छा भेट देऊन येथील कामाचा आढावा घेतला यावेळी भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, निलकंठ मठपती, सिद्धेश्वर उस्तुरगे, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख,अविनाश पाटील, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, वीरेश उंबरजे, संतोष बंडगर, सतिश महाले आदि उपस्थित होते.
जुन्या ९० एचपीच्या पंपामुळे अनेक वेळा पाणीपुरवठा खंडित होत होता मंजूर झालेल्या रकमेतून आता 240 एचपीचे दोन पंप व 150 एचपीचे 3 पंप याचबरोबर पूर्वी ८ इंची असलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन आता १४ इंची होणार असून भवानी पेठ पाणी गिरणी येथे बसवण्यात येणार असल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *