ऑर्किड च्या प्रांगणात अवतरली खाऊ गल्ली

सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड स्कूल सोलापूर मध्ये दोन दिवसीय “फन फेअर २०२३” चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्धघाटन अरिहंत स्कूल चे अध्यक्ष अजय पोन्नम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी विश्वस्त सौ.लक्ष्मी करजगी, वनिताताई करजगी , नंदिनी करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा, शिक्षक समन्वयक राजेश्वरी शिरकणहळळी, उज्वला मुळे, सविता बिराजदार, हेमा बालिंगण, राणी दळवी, हिना पटेल व स्कूलचे सांस्कृतिक व क्रीडा प्रमुख आनंद लिगाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी म्हणाले हा महोत्सव भरविण्यामागे एकच हेतू आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच आर्थिक,व्यावसायिक धडे मिळाले पाहिजे शिक्षण जसे आयुष्यात महत्वाचे आहे तसेच आर्थिक व्यवहार देखील जमले पाहिजेत तरच आपण जगाशी स्पर्धा करू शकतो.
नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फन फेअर चे आयोजन करण्यात आले यावेळी यामध्ये ६० हुन अधिक प्रकारचे फूड स्टॉल तसेच गेम स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले आहेत. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन तृप्ती चाटी यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *