समाजातील सर्व स्तरातून भ्रष्टाचाराला प्रतिबंध होणे गरजेचे : पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह संपन्न

सोलापूर : समाजात भ्रष्टाचाररुपी किडीने संपूर्ण सार्वजनिक जीवन पोखरून निघत असल्याने आपले सामाजिक आरोग्य जपण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून भ्रष्टाचाराचा प्रतिबंध होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले. सोलापूरातील सातरस्ता परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना गणेश कुंभार म्हणाले की, भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून यामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते युवकांनी सामाजिक आणि प्रशासकीय कार्य करताना लाच घेणे आणि लाच देणे टाळले पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, युवकांनी आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी सतत दक्ष असणे गरजेचे आहे तरी त्यांनी आजूबाजूच्या परिसरात भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी जनजागृती करायला हवी. बहुजन समाजाच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत परिणामकारक पद्धतीने पोहोचतात की नाही याची खबरदारी घ्यायला हवी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय रेवजे यांनी केले सूत्र संचालन डॉ. इंदुमती चोळळे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल कांबळे यांनी केले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष सोनवणे, गायकवाड, डॉ. दशरथ रसाळ, प्रा. मोहन चव्हाण, प्रा. संतोष मारकवाड, प्रा. अमोल मोरे, प्रा. अरुणा कोडम, प्रा. शशांक बिराजदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *