‘एलबीपीएम’ महाविद्यालयाच्या वतीने दिपावली फराळ वाटप

सोलापूर : सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील इतिहास, मराठी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोलापूर शहर आणि परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाआश्रम, बाल सुधारगृह आदी ठिकाणी सदिच्छा भेट देण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांकडून संकलित केलेले फराळ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू कुमठा नाका परिसरातील कुष्ठरोग वसाहत, बाल सुधारगृह, कारंबा येथील स्नेहालय, एनएबी अंध कार्यशाळा, पाखर संकुल, तिरुपती नगर येथील शांताई अनाथाश्रम येथे फराळ वाटप करण्यात आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्रा.देवराव मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *