मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन

सोमपा आवारात शपथ स्वाक्षरी मोहिमेचा पत्रकारांच्या हस्ते शुभारंभ…

एकच लक्ष्य – शहर स्वच्छचा निर्धार करण्याचा दिला संदेश !

सोलापूर : “मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन” यासह पर्यावरण रक्षणाची शपथ घेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज शपथ स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. “एकच लक्ष्य – शहर स्वच्छ”चा संदेश याद्वारे देण्यात आला.
       सोलापूर महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरिक 2.0 या अंतर्गत या “शपथ – स्वाक्षरी मोहिमे”चा प्रारंभ आज सायंकाळी महापालिका आवारात ‘आय लव्ह सोलापूर’ या सेल्फी पॉईंट जवळ करण्यात आला यावेळी सोमपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप , घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सफाई अधीक्षक अनिल चराटे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे,पत्रकार राहुल,शेख सर नितीन पात्रे, प्रभू वारशेट्टी, विशाल भांगे,याचबरोबर स्वच्छता अभियानचे शहर समन्वयक दामिनी जवळकर, तेजस शहा, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
      ” मी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळेन ! मी पर्यावरण पूरक स्थानिक उत्पादनाचा वापर करेन !! मी प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करेन !!! ” ही शपथ वाचून या  फलकावर उपस्थितांनी स्वाक्षरी केली याद्वारे “एकच लक्ष्य – शहर स्वच्छ” तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे. याप्रमाणेच शहरात विविध ठिकाणी ही शपथ – स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रसंगी अनेक नागरिक, कर्मचारी व पत्रकार आदींनी स्वाक्षरी केली.


       नागरिकांनी प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावीआणि पर्यावरण रक्षणासंदर्भात शहरवासीयांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी विविध ठिकाणी या मोहिमेत स्वाक्षरी करून सहभाग नोंदवावा पर्यावरण रक्षणाचा कृतिशील निर्धार करावा, असे आवाहन सोमपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *