महेश भवन आणि गार्डनचे बुधवारी उद्घाटन…

सोलापूर : श्री महेश सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सम्राट चौकातील महेश नगर येथील महेश भवन आणि गार्डनचे उद्घाटन बुधवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजता खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे असणार अशी माहिती संस्थेचे सभासद पुरुषोत्तम धूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.महेश नगर येथे परिसरातील नागरिकांकरिता विविध सामाजिक उपक्रमांसाठी महेश भवन आणि गार्डनचे सुशोभिकरण व नुतनीकरण करण्यात आले आहे. ६०० चौ. फुटांच्या या तीन मजली भवनात १९ खोल्या असून ११० जणांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच २२ हजार चौ. फुटांचे उद्यान साकारण्यात आले असून टेरेस गार्डनदेखील बनविण्यात आले आहे. तसेच या महेश भवनमध्ये भव्य सभागृह, बैठकांसाठीचे विश्रामकक्ष, चिमुकल्यांना खेळण्यासाठी गार्डन तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हे कार्य हाती घेऊन पूर्ण करण्याची प्रेरणा जुगलकिशोर राजाराम करवा यांनी दिली महेश भवन आणि गार्डनच्या उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या कार्यकारणी मंडळाने यावेळी केले या पत्रकार परिषदेस पंकज शर्मा , पुरुषोत्तम धूत, निलेश भंडारी, शितल सोनी, राजेश जाजू, मनीष पंचारिया, श्रीकांत करवा, अभिषेक तापडिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *