लोकमंगलचा ‘ शुभमंगल ‘ ३१ डिसेंबर रोजी संपन्न होणार…!

लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शिवाजी अध्यापक विद्यालय प्रांगणात गोरज मुहुर्तावर पार पडणार

सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड. कॉलेज) भव्य प्रांगणात सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या लग्नसोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प करण्यात आले असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संचालक शशी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विवाह हा एक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे तो पार करत असताना समाजातील सामान्य नागरिकांना विवाहाचा आर्थिक खर्च सहन करावा लागतो. विवाहवेळी येणाऱ्या अडचणींना होणारी पैशाची उधळण, जाचक हुंडा पद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत आहेत आजपर्यंत 3024 जोडपी विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली असून लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 18 वे वर्ष आहे. विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी अनेक ठिकाणी एकूण 125 पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य दिले जाते. वधू- वरांची सोलापूर शहरातून दोन वेगवेगळ्या मार्गावरून वरात काढली जाते प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जातात आजपर्यंत या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदू 2317, बौद्ध 676, मुस्लीम 20, ख्रिस्ती 4, जैन 7 या प्रमाणे सर्वधर्मीय एकूण 3024 विवाह पार पडले आहेत.तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे
या पत्रकार परिषदेला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक शशी थोरात, सुनील गुंड, मारुती तोडकर, डॉक्टर शिवराज सरतापे आदी उपस्थित होते.

■■■
नाव नोंदणी सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या कार्यालयात सुरु आहे 20 डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. संपर्कासाठी पत्ता :- लोकमंगल फाऊंडेशनचे ऑफिस अन्नपूर्णा 13 अ, सझाड़ी कॉलनी, सोलापूर 413003 फोन नंबर 02172606070, 2735533 मो. नं. 9657709710 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहॆ.

■■■ सोहळ्यामध्ये जपणार सामाजिक भान

उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल वऱ्हाडी मंडळीना ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी रक्तदान शिबिराचे स्वतंत्र दालन केले जाणार आहे. वऱ्हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे वधू- वरांचे भावी जीवन समाधानकारक व सुखी व्हावे यासाठी मान्यवर समुपदेशक व डॉक्टरांच्या मार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना सरकारी कन्यादान योजनेंअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन प्रयत्न केले जाणार आहेत.

■■■ लोकमंगलचा मदतीचा हात

समाजामधील स्त्री भ्रूणहत्या, आत्महत्या रोखण्यासाठी लोकमंगल सामुदायिक विवाह
सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यास प्रथम मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे 2 हजार रूपयांची ठेव लोकमंगल फाउंडेशन व त्या मुलीच्या नावाने संयुक्त खात्यामध्ये 18 वर्षे मुदतीसाठी ठेवण्यात आली आहॆ. आजपर्यंत अशा समुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यांच्या 235
मुलींच्या नावे ठेव ठेवण्यात आलेली आहे लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *