सिध्देश्वर सहकारी बँक व रंगसंवाद प्रतिष्ठान संयोजीत बालरंग महोत्सवाचे शनिवारी आयोजन

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी खुली सांस्कृतिक मेजवानी

सोलापूर : सोलापूरातील सिध्देश्वर सहकारी बँकेच्या वतीने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पहिला कार्यक्रम हा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून बालदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी बालरंग महोत्सव याचे आयोजन केले असून हुतात्मा स्मृती मंदीर येथे शनिवार दि १८ नोव्हेंबर २३ रोजी दुपारी ५.०० वा. संपन्न होत असलेल्या या बालरंग महोत्सवाचे उद्घाटन स्वामी समर्थ सुत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या शुभहस्ते होत असून यावेळी मा.आ.प्रकाश यलगुलवार, मा.विजयकुमार साळुंके प्रा.अजय दासरी या शहरातील आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तिन्ही शाखेचे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहीती बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
जुळे सोलापूर येथील रंगसंवाद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डाॅ. मीरा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ८० बालकलाकार नाट्य, नृत्य,गायन, वादन व नकला सादर करणार असून या महोत्सवात बालकलाकार एक एकांकिका ही सादर करणार आहेत या महोत्सवास सर्वांना खुला प्रवेश असून विशेषत पालकांनी व विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद लुटावा असे आवाहन बँकेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे यांनी केले आहे या बालरंग महोत्सवाच्या संयोजनासाठी डाॅ. मीरा शेंडगे यांच्यासह सर्वश्री गुरू वठारे, अमोल धाबळे, म. जुबेर हिप्परगी, श्रीनिवास काटवे व सुनिल सर्जे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *