कंत्राटी डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘आक्रोश’ पदयात्रा

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु असून या पार्श्वभुमीवर आज चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार जिल्हा परिषद या मार्गांवर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. सोलापूर शहर व ग्रामीण सर्व जिल्हास्तरीय प्रा. आ. केंद्र, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथील “राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण सर्व अधिकारी कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घ्यावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिपीई किट घालून पदयात्रेत सहभागी झाले होते. कंत्राटी कर्मचारी कायम करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता शासन सेवेत कायम करा अशा मागणीचे टोप्या परिधान करून विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन घोषणा देत कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले होते.या पदयात्रे नंतर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागण्यांचे निवेदन डाॅ.आतिष बोराडे, विजया कांबळे, रवी माने, महेश चिली, राम गोगाव, विनायक दळवी यांनी दिले.
पदयात्रेत महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव, सचिव शंकर बंडगर, मुकूंद आकुडे यांचे सह आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण अधिकारी कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत असून कोरोना काळात याच कर्मचा-यांनी घरदार जीवाची परवा न करता आपले कर्तव्ये चोखपणे बजावले आहे. शासन सेवा समायोजन करावे अशी त्याची मागणी असून मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आरोग्य मंत्र्यानी दिलेले आश्वासन लेखी स्वरुपात प्राप्त होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचे पावित्रा त्यांनी घेतला आहे. ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन केले आहे. त्याच पध्दतीने राज्य शासनाने देखिल लवकरात लवकर समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे या कामबंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेवर होत आहे.

■■■
कंत्राटी कर्मचारी कायम करा – प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव
किती दिवस कर्मचाऱ्यांना आशा दाखविणार आहात कर्मचारी यांचे सहनशिलतेचा अंत पाहू नका असे ठाम मत प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले आहे ५० टक्के जागावर कंत्राटी कर्मचारी यांचे समायोजन करा. चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलकांसमोर ते बोलत होते शासनाने संबंधीत आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *