सिईओ मनिषा आव्हाळेंच्या संवेदनशिलतेने जि.प. कर्मचारी भारावले

कनिष्ठ प्रशासन अधिकारी गायकवाड यांची आस्थेने केली प्रकृतीची विचारपूस

सोलापूर : दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्षाघाताचा झटका आला होता नंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.
कुटुंब प्रमुख म्हणून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दाखविलेले संवेदनशीलतेमुळे जि.प.कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीची भावना व्यक्त केली जात आहे. दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कामकाज करताना पक्षाघाताचा झटका आल्याने येथील गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ व उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गायकवाड यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल केले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने उजव्या हातापायातील ताकद कमी झाली असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. गायकवाड यांना रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती सिईओ यांचे स्वीस सहाय्यक देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांना निदर्शनास आणून दिले असता अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली व त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अग्रवाल यांच्याशी अर्धा तास बसून उपचाराबाबतीत चर्चा केली. आपल्या जिल्हा परिषदेच्या कुटुंबातील एका सदस्यावर झालेल्या आघातावर त्यांनी अत्यंत संवेदनशीलता बाळगुन रूग्णालयात धाव घेत विचारपूस केल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वर्गात त्यांच्या संवेदनशीलते बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *