कलागुणांसोबत बालगोपाळांनी खेळांकडेही लक्ष देणे आवश्यक – राजशेखर शिवदारे

सिध्देश्वर बँक – बालरंग महोत्सव

सोलापूर : नृत्य, संगीत,गायन, वादन, नाटक या सांस्कृतिक कलागुणांसोबत लहान पिढीने खेळांकडे म्हणजेच व्यायामाकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वामी समर्थ सुतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी केले.
सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मृती मंदीर येथे आयोजित केलेल्या बालरंग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तिन्ही अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विजयकुमार साळुंके व प्रा. अजय दासरी, बँकेचे चेअरमन प्रकाश वाले व व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे, प्रशांत बडवे यावेळेस बँकेचे संचालक पशुपती माशाळ,ॲड. एम.के.पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, सिध्देश्वर मुनाळे व प्रकाश हत्ती आदी उपस्थित होते प्रारंभी चेअरमन प्रकाश वाले यांनी प्रास्ताविक व स्वागत करून बँकेची वाटचाल विषद केली.


या बालरंग महोत्सवात सोलापूरातील ८० अतरंगी बालकलाकारांनी नृत्य, नाट्य, गायन, वादन व नकला अशी कला सादर करून प्रेक्षकांचे रंजन केले. अंबा नृत्यालयाच्या ४० कलाकारांनी सादर केलेली गणेश वंदनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंबादास कनकट्टी याचा चार्ली चॅप्लीन, कनिष्का शिवपुजे हिचे शास्त्रीय गायन व प्रख्यात सुंदरी वादक सिद्राम जाधव यांची मुले कलाश्री जाधव व व्यंकटेश जाधव यांनी सादर केलेले सुंदरी वादन यांच्या सादरीकरणाने विशेष रंगत आणली. या महोत्सवासाठी रंगसंवाद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. मीरा शेंडगे यांनी सहयोगी संस्था म्हणून बालरंग महोत्सवात विशेष सहभाग नोंदविला अमोल धाबळे यांनी सूत्रसंचालन केले तर नरेंद्र गंभिरे यांनी आभार व्यक्त केले बँकेचे सरव्यवस्थापक रामलाल शर्मा, उप-व्यवस्थापक संजय घाळे, प्रशासन अधिकारी संजय घाळे, सेवक प्रतिनिधी राजेश कलशेट्टी आदीनी या महोत्सवा करीता परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *