सोलापूरात २ व ३ डिसेंबरला पाळीव प्राण्यांचे भव्य प्रदर्शन

सोलापूर : सोलापूरातील केनल फाऊंडेशन ऑफ सोलापूर टाउन व पेटशॉप ओनर्स असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील मीरा सोसायटी अंत्रोळीकर नगर येथे २ व ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत डॉग / कॅट स्पर्धा व विदेशी ( exotic ) या पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती आशिष म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर प्रदर्शनात विविध प्रकारची देशी-विदेशी श्वान (कुत्रे), मांजरी सशुल्क स्पर्धक म्हणून सहभागी केली जाणार आहेत व तसेच विदेशी (exotic) पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बॉल पायथन, इगूआणा, सलकाटा टोरटोईज, हेजहाँग, रबिट, गिनीपिम्. हॅमस्टेर, व्हाइट माइस, मकाओ, आफ्रिकेन से पॅरोट, सन कनूर, कोकाटेल, आफ्रिकन बड्स, बजीज, इत्यादी पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन होणार आहे सदर कार्यक्रम स्थळी सहभागी डॉग व कॅटचे तज्ञ डॉक्टरामार्फत मोफत आरोग्य तपासणी व मोफत रेबिज लस देण्यात येणार आहे सहभागी सदस्यांना मोफत पेट फूड सँपल्स व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

प्रदर्शन पाहावयास येणाऱ्या सामान्य नागरिकांना प्रवेश शुल्क नाममात्र ३० रुपये इतके असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नाममात्र प्रवेश शुल्क १० रुपये ठेवण्यात आले आहे ( विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्र आवश्यक आहे ) शहरातील शाळा महाविद्यालयांनी माहितीपूर्ण व अभ्यासात्मक प्रदर्शनात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले
पाळीव प्राण्यांच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहराच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आयोजन ठरणार असून शहरवासीयांच्या जास्तीत जास्त प्राणी प्रेमी व सामान्य जनतेला या आयोजनाचा आनंद घेता येणार आहे या पत्रकार परिषदेस सावान ऐवले,नितीन कुडक्याल, पशुचिकित्सक दत्तात्रय केंगार आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *