महात्मा ज्योतिबा फुले हे वैचारिक आणि कृतिशील सामाजिक लढ्याचे अग्रणी : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

एलबीपीएम’ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर : भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील भारतीय संक्रमणावस्थेतील सावकारशाही, पुरोहितशाही आणि ब्रिटीश नोकरशाहीकडून धर्म, कर्म, व्यवहार यात येथील शेतकरी, कष्टकरी, स्त्री, शूद्र, अतिशूद्र गाडले जाऊ नयेत म्हणून भारतात उभारल्या गेलेल्या वैचारिक आणि कृतीशील सामाजिक लढ्याचे महात्मा ज्योतिबा फुले हे अग्रणी आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले.

सोलापूरातील सात रस्ता परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. ढेरे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे मुलगामी चिंतन मांडतानाच त्यासाठी तन-मन-धनाने चळवळी उभ्या करून प्रसंगी कोर्टकज्जेही केले. या दृष्टीने महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना दिलेले “आधुनिक महात्मा” हे संबोधन यथार्थ ठरते आपले सामाजिक पर्यावरण निकोप राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर करायला हवा असे आवाहन त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, डॉ. विजय रेवजे, डॉ. अनिल कांबळे, प्रा. भक्तराज जाधव, डॉ. नागोराव भुरके, डॉ. प्रदीप जगताप, प्रा. संतोष मारकवाड, प्रा. अमोल मोरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *