नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा – प्रा काकासाहेब कुलकर्णी

आगामी अधिवेशनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केंद्राबाबत पाठपुरावा करणार

प्रतिनिधी : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र ( मिलेट सेंटर ) हे बारामतीला नेण्याबाबत 26 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला होता त्यावर सर्वप्रथम महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी जोरदार आवाज उठवला होता त्यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीना हे प्रशिक्षण केंद्र सोलापूरला टिकवण्यात अपयश असल्याचे देखील म्हटले होते. यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडत सोलापूरच्या शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं होतं परंतु दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना हे केंद्र जर सोलापूरला राहील नाही तर मी नैतिकदृष्ट्या या पदावर राहण्यासाठी योग्य नाही असं त्यांनी म्हणलं होतं तसेच इथल्या दहा आमदारांचा अपयश आहे असं देखील ते म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत खुलासा मागितला होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांनी यावर खुलासा करत केंद्र सोलापूरला व प्रशिक्षण केंद्र बारामतीला असल्याचे सांगितले होते. यानंतर सोलापूरकरांच्या लक्षात आले की प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला गेले आहे यावर बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या विकासासाठी सर्वप्रथम राजीनामा देऊन स्वतः जनतेला दिलेला शब्द खरा करावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे त्याचप्रमाणे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटल्याप्रमाणे उर्वरित त्यांच्या नऊ आमदार दोन खासदारांनी सुद्धा सोलापूरकरांची माफी मागत हे प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेल्याचे सांगून नैतिकतेने राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केले तसेच येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सदर केंद्र सोलापूरला व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी म्हटले आहे

गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी सोलापूर मध्ये फक्त निवडणुकीच्या घोषणा मधून मोठ्या मोठ्या घोषणा करते प्रत्यक्षात काम मात्र काहीच करत नाही उडान या योजनेमध्ये सोलापूर विमानतळाचा समावेश असताना सुद्धा विमानसेवा आज पर्यंत चालू झाली नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या काही प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले त्याचीही काम सुरू झालेले नाहीत त्यामुळे भाजपा निवडणुकीचा जुमला करते हे आता सिद्ध झाले आहे त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतः दिलेला शब्द खरा करून दाखवावा असे केल्यास आमदार सुभाष देशमुख यांचा आपण स्वतः जाहीर सत्कार करू असे आव्हानच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *