सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचचे ११ डिसेंबर रोजी एकदिवसीय आंदोलन

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सोलापूरवर सतत होणार्‍या अन्याय विरोधात सोलापूरकरांचा एल्गार

प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात खाली नमूद केलेल्या विषयांवर सोलापूरच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने आवाज न उठवल्याचा संताप सोलापूरकरांच्या मनात असुन सदर रोष व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असून सर्व सोलापूरकरांनी ह्यात सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, अॅड. प्रमोद शहा आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

१) श्री अन्न प्रक्रिया केंद्र अर्थात मिलेट सेंटरचे बारामतीला स्थलांतर रद्द करण्यात यावे.
२) गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने आणि पाच दिवसातून एकदा पाणी येते, ह्या करिता दुहेरी जलवाहिनी हा त्यावर एकमेव उपाय नसुन हिप्परगा एखरुख तलावातील गाळ काढण्याचे कार्य तातडीने मार्गी लावल्यास शहराची ७०% पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि समस्या सुटेल.
३) सी एन एस हॉस्पिटल ते सोरेगाव हा रस्ता भुमी अधिग्रहणच्या केवळ ५१ कोटी रुपयांसाठी ५४ मिटर रस्तां न होणे हे सोलापूरकरांठी शोकांतिका आहे.
४) गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरातील मंजूर दोन उड्डाणपुलाचे काम आजतागायत न झाल्यामुळे शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
५) ०१ जानेवारी पासून सोलापूरात सर्व जाती जमातीच्या मिरवणूकीं दरम्यान डि.जे. आणि लेझर वर कडक निर्बंध लादल्यास सोलापूरची प्रतिमा उंचावेल.
६) सोलापूर शहरास इलेक्ट्रिक बसेस ऐवजी सीएनजी आधारित मिनी आणि मिडि बसेसच व्यवहार्य आहेत.
७) कुंभारी एम.आय.डि.सी. मंजूर होऊन एक दशक होत आले तरी अजून प्रत्यक्षात अस्तित्वात येत नाही.
८) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्रत्येक ५०० मिटर वर महिला प्रसाधनगृहे असणे आवश्यक असुन सोलापूरात त्याची अमलबजावणी होताना दिसुन येत नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे.
९) होटगी रोड विमानतळावरील सर्व कामे तातडीने पूर्ण करुन नागरी विमानसेवा लवकर सुरू करणे.
१०) हद्दवाढ भाग जुळे सोलापूरच्या विकासासाठी जुळे सोलापूर प्राधिकरण स्थापन करण्यात यावे.
ह्या सर्व विषयांवर रविवार दिनांक ०३ डिसेंबर रोजी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना तसेच
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही
सोलापूर विकास मंचच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *