” विकसित भारत संकल्प यात्रेला ” सोलापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत आयोजित विशेष शिबिराला सोलापूर शहरातील भवानी पेठ येथे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविले केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसारासाठी सुसज्ज व्हॅन्स सोमपाच्या आठही विभागीय कार्यालयीन परिसरामध्ये मध्ये फिरणार असून, यामध्ये आत्तापर्यंत शहरातील 2870 नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. “विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून सोमपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्यमान कार्ड अशा आरोग्य विभागाच्या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासोबत या शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, पी.एम. स्वनिधी याबद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जात आहे. वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे ही रथयात्रा येत्या 13 डिसेंबर पर्यंत सोलापूर शहरात विविध ठिकाणी फिरणार असून त्या त्या परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमपा आयुक्ता शीतल तेली-उगले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *