राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जनहितार्थ फिल्म
मुंबई √ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या ( महापारेषण ) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके पटकावले ही आनंदाची बाब असून त्यासाठी ‘टीम महापारेषण’चे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले
महापारेषण समाचार या गृहमासिकात अनेक डिजिटल बदल, क्यू-आर कोड, पॉडकास्टचा प्रभावी वापर, व्हॉटसअप बुलेटिन, ऑडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉटसअप चॅनेल आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे महापारेषणने जनसंपर्काबाबात एक पाऊल पुढे टाकले असल्याचे दिसून येत आहे सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍंड पीआर, ब्रेडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म ( इंग्रजी ) व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान या विशेष पुरस्कारांसाठी महापारेषणचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे यापुढेही उत्कृष्टतेचा ध्यास घेत महापारेषणचे अधिकारी – कर्मचारी सेवेचा नवा आदर्श घडवतील अशी आशा त्यांनी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांना पत्राद्वारे व्यक्त केली.