जुना कारंबा रोडचे हाल झाले बेहाल…दुरूस्तीसाठी केली पाहणी

सोलापूर √ सोलापूरातील प्रभाग 5 जुना कारंबा नाका रोड ते बार्शी रोड टोल नाका मार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे हजारो नागरिकांचे हाल बेहाल होत असून इथे दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले असता माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांनी तातडीने रस्ता दुरुस्ती करणे बाबत सोमपा अधिकाऱ्यांसोबत धोकादायक खड्ड्यांची व पुलाची पाहणी केली.

जुना कारंबा नाका ते बार्शी टोल नाका या प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे धोकादायक खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे या प्रमुख मार्गावरील कळके वस्ती,पांढरे वस्ती तसेच खेड,भोगाव आदि भागांकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे तसेच सोमपा आरोग्य विभागाचे कचरा व्यवस्थापन केंद्रही याच मार्गावर असल्याने अनेक अपघात होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार व गरजेनुरूप माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे ,गणेश पुजारी सोमपा रस्ते विभाग अधिकारी तपन डंके,अवेक्षक सागर करूसेकर , अविनाश भडकुंबे आदींनी रस्ते पाहणी केली व ताबडतोब रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे सोमपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *